पोस्ट्स

अपंगांच्या 5% निधीसाठी प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव आक्रमक परिसरातील ग्रामपंचायतींना दिले निधी वाटपाचे निवेदन

इमेज
*किनगाव प्रहार जनशक्ती पक्षाचा वतीने अपंगांचा ५ टक्के निधी साठी किनगाव सर्कल मधील गावातील ग्रामपंचायतीस भेटी.*     *किनगाव*:- प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव च्या वतीने किनगाव सर्कल मधील गावो गावी जाऊन अपंग 5% निधी वाटपासाठी प्रहार च्या वतीने उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज ग्रामपंचायत कार्यालय मोहगाव / गुंजोटी चे ग्रामसेवक यांना जिल्हा प्रमुख राजाभाऊ चौगुले, तालुका अध्यक्ष संभाजी दादा केंद्रे, तालुका युवा अध्यक्ष बाळासाहेब गायकवाडयांच्या मार्गदर्शनाखाली आज दि 31/10/2020 ग्रामपंचायत कार्यालय मोहगाव,गुंजोटी,येथे जाऊन पुनर्वसन कायद्यानुसार अपंग बांधवाचा या आर्थिक वर्षातील 5% निधी वाटप करावा कारण कोरोना माहामारीच्या काळात अपंग बांधवांची आर्थिक परिस्थिती खुप बिकट झाली आहे व त्यांना आधार देण्यासाठी राखीव असलेला 5%निधी वाटपासाठी प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव च्या वतीने सरपंच/ ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन देताना शहराध्यक्ष बाळू आमले, योगेश आमले (माळी) अध्यक्ष, उपाध्यक्ष मोहसीन शेख, कार्यअध्यक्ष प्रकाश जोशी, कोषाध्यक्ष एजाज पठाण, सचिव दशरथ हैगले,दिनेश किनकर, वैजनाथ चाक...

वल्लभभाई पटेलांचा एस सी / एसटीच्या आरक्षणाला विरोध होता - प्रा. हरी नरके

*अनुसुचित जाती,जमातींच्या आरक्षणाचे विरोधक वल्लभभाई पटेल-* *प्रा. हरी नरके* ************************************ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आग्रहामुळे आणि महात्मा गांधींच्या पाठींब्यामुळे अनुसुचित जाती व जमातींना राज्यघटनेने आरक्षण दिलेले होते. गांधींजींची हिंदुत्ववादी नथुराम गोडसेने ३० जानेवारी १९४८ ला हत्त्या करताच काँग्रेसमधल्या सनातनी गटाने आरक्षणविरोधी उसळी घेतली. त्यांचे नेते होते वल्लभभाई पटेल. पटेल यांचा हिंदुत्ववाद्यांना पुळका असतो, त्याची जी अनेक कारणे आहेत त्यातले मुख्य कारण पटेल आरक्षणविरोधी होते हे होय. गांधीहत्त्येच्या अवघ्या २५ व्या दिवशी पटेलांनी आरक्षणविरोधकांची बैठक बोलावली आणि आरक्षण काढून घेण्याचे डावपेच आखायला सुरुवात केली. पटेल घटना परिषदेच्या अल्पसंख्यांक उपसमितीचे अध्यक्ष होते. राज्य घटनेने अनु. जातीजमातींना दिलेले आरक्षण रद्द करावे असा ठराव स्वत: पटेलांनी ३० डिसेंबर १९४८ च्या उपसमितीच्या बैठकीत मांडला. त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कडाडून विरोध केला. ते म्हणाले, " घटना परिषदेने या आधीच आरक्षणाला मान्यता दिलेली असल्याने ते काढून घेण्याचा विषय उपसमितीच्य...

ओबीसींना सैनिकी शाळेत 27% आरक्षण , राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या लढ्याला यश

*सैनिकी शाळांमध्ये ओबीसींना मिळणार 27% आरक्षण* सैनिकी शाळांमध्ये ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 27% आरक्षणाचा लाभ मिळेल ... हे शैक्षणिक सञ 2021-2022 पासुन लागु केले जात आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाने 2 डिसेंबर 2019 ला निवेदनाद्वारे सैनिक विद्यालयात ओबीसी आरक्षणाची मागणी केली होती व आंदोलनेही केली होती व ओबीसी पार्लमेन्ट कमेटीचे अध्यक्ष खा.गणेश सिंग याच्या कडे सातत्याने पाठपुरावा करत होते.भारतातील सैनिकी शाळांमध्ये प्रवेश घेउ इच्छिनाऱ्या बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी आनंदाची बातमी आहे भारत सरकारचे संरक्षण सचिव अजय कुमार यांनी या संदर्भात माहिती दिली आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाने या निर्णयाचे स्वागत केले आहे व ओबीसी पार्लमेन्ट कमेटी अध्यक्ष गणेश सिंग याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे, कार्याध्यक्ष डॉ खुशाल बोपचे, समन्वयक डॉ अशोक जीवतोडे , महासचिव सचिन राजूरकर, कर्मचारी अधिकारी महासंघ राज्याध्यक्ष शाम लेडे राज्य सरचिटणीस अनिल नाचपल्ले .दिनेश चोखारे, रणजित डवरे प्रा शेषराव येलेकर, बबलू कटरे, विजय पिदूरकर,सुषमा भड, कल्पना मानकर यांनी आभार मा...

वल्लभभाई पटेल शेतकऱ्यांचे सरदार - गणेश दादा हाके पाटील

इमेज
*वल्लभभाई शेतकऱ्यांचे सरदार होते*                   गणेश हाके  अहमदपूर : भारताचे लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांना ब्रिटीशांच्या अन्यायाविरुद्ध शेतकऱ्यांचे नेतृत्व केले वल्लभभाई शेतकऱ्यांचे सरदार होते असे उद्गार भाजपाचे ज्येष्ठ नेते गणेश दादा हाके पाटील यांनी येथे काढले सरदार वल्लभभाई पटेल यांचे 145 व्या जयंतीनिमित्त बालाघाट तंत्रनिकेतन येथे आयोजित जयंती संमारंभात ते बोलत होते  स्वातंत्र्यलढ्यात वल्लभभाई ची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती परंतु स्वातंत्र्यानंतर देशाततील सर्व संस्थाने खालसा केली हैदराबाद संस्थान खालसा करण्यासाठी लष्करी कारवाई करून हैदराबाद संस्थान ताब्यात घेतले व अखंड भारताचे स्वप्न साकार केले त्यांच्या या योगदानाबद्दल प्रत्येक भारतीयाने कृतज्ञ असले पाहिजे असे मत यावेळी श्री हाके यांनी व्यक्त केले. यावेळी श्री हाके यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांनी आदरांजली वाहिली. यावेळी प्राचार्य डॉ एन.पी. शिवपूजे,उपप्राचार्य एस.बी. नागरगोजे, आरदवाड एम.एन., दहिटनकर एस.बी.,कोपनर एस.टी.,...

ऑल इंडिया पँथर सेनेची आढावा बैठक संपन्न

इमेज
ऑल इंडिया पँथर सेना चाकुर च्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक संपन्न.             चाकुर :- चाकूर येथील शासकीय विश्रागृहात ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कशा प्रकारे संघटन बांधनी करावी या विषयावर लातूर जिल्हा निरिक्षक आकाश कांबळे व चापोली शहराध्यक्ष गोपाळ सरकाळे यांनी मार्गदर्शन केले.              यावेळी चाकुर ता. सचिव बुध्दभुषण गायकवाड, चाकुर शहराध्यक्ष विश्वजीत महालिंगे, कुलदीप कांबळे, गौतम तांदळे, गायक लखन माने, प्रतिक महालिंगे, अनुज कांबळे, समाधान गायकवाड आदिंची उपस्थिती होती.

प्रहार जनशक्ती पक्षाच्या व लॉयन्स क्लब उदगीरच्या वतीने मोतीबिंदु शिबीर संपन्न

इमेज
प्रहार जनशक्ती पक्ष व उदयगिरी लाँयन्स नेत्र रूग्णालय यांच्या संयुक्त विघमाने मौजे पाटोदा बु येथील भव्य मोतीबिंदू शिबीर संपन्न* दि.28/10/2020 ऑक्टोबर रोजी जळकोट तालुक्यातील मौजे पाटोदा ग्रामपंचायत कार्यालय येथील टाळता येणारे अंधत्व कमी करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष व उदयगिरी नेत्र रूग्णालय विशेष मोहीम घेत ग्रामीण भागातील मोतीबिंदू बँकलाँग व मोतीबिंदूचा लोड कमी करण्यासाठी गावातील सर्व वृद्ध स्त्री व पुरुष नेत्र तपासणी आे पी डी ९० व शस्त्रक्रियेसाठी २४जन शिबीर कार्यक्रम संपन्न झाले कार्यक्रमाचे उद्घाटन मा.पोलीस निरीक्षक जळकोट .श्री.जी. एम.सोंदारे साहेब यांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेचे पुजन झाले , तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. श्री.चंद्रहार ढोकणे साहेब बी. डी.ओ. जळकोट तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.आर.एन.लखोटिया साहेब , श्री. माधव होनराव तालुकाध्यक्ष प्रहार अपंग क्रांती आंदोलन , श्री. राजाभाऊ चौगुले जिल्हाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष लातूर होते व डाॅ पटेल व बी डी आे ढाकणे साहेब यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे आयोजन श्री. नागनाथ हरिभाऊ गुट्टे ता.संपर्क प्रमु...

रावण दहन करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची आदीवासी समाजाची मागणी

इमेज
*राजा रावन दहन बंद करा*  प्रतिनिधी कळमनुरी  दि.22 ऑक्टोंबर  विजयादशमीच्या दिवशी हिंगोली व जिल्ह्यात होणारे राजा रावण दहन तात्काळ बंद करा .  राजा रावण आदिवासी सामाजाचे आदर्श  आहे व आदिवासी सामाज राज रावण यांना आपले दैवत मानतात त्यामुळे आदिवासी सामाजाच्या भावना दुखावल्या जातात. हिगोंली जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी राजा रावण पुतळ्याचे  दहन करण्यात  आले तर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. उपस्थित भारतीय आदिवासी पॅंथर संघटना चे अध्यक्ष प्रशांत बोडखे ,रावण साम्राज्य ग्रुपचे अध्यक्ष सुखदेव कोकाटे,रावण साम्राज्य ग्रुपचे उपअध्यक्ष राम ढाकरे, नवनाथ बेले,सचिन चिभडे, अंकुश बंदुके,दाटे दिपक उपस्थित आदिवासी समाज बांधव.  *बातमी शेअर करा आणि आपल्या बातमीला प्रसिध्द करण्यासाठी संपर्क साधावा  कळमनुरी प्रतिनिधी गुणाजी चाकोते सर