घनसोली येथे छ.शाहु महाराज जयंती साध्या पद्धतीने साजरी
* घणसोलीत राजर्षी शाहू महाराज जयंती साध्या पद्धतीने साजरी.* दि.२६ जून २०२१ रोजी बुद्धघोष विहार सेक्टर 4, घणसोली, नवी मुंबई. येथे आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज तथा यशवंत आबासाहेब घाडगे यांची 147 वी जयंती कोरोना प्रादुर्भावाचे सर्व नियम पालन करून अगदी साध्या पद्धतीने सर्वपक्षीय राजकीय, सामाजिक संघटनेच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. आरक्षणाची गरज व त्याची निर्मिती लोकहित कल्याणकारी कशी आहे आणि आजच्या आधुनिक युगातही आरक्षणासाठी आजच्या पिढीला लढा द्यावा लागतो त्यामुळे त्याची चिकित्सा, चिंतन करण्याची गरज समाजाला आजही तितकीच महत्त्वाची आहे यावर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी आपले आपले विचार मांडले. सदर कार्यक्रमाची सुरुवात बौद्धाचार्य डी.एस. सूर्यवंशी यांनी बुद्ध वंदना घेऊन राजर्षी शाहू महाराजांना पुष्पगुच्छ अर्पित करून करण्यात आली. यावेळी शाहू महाराजांचा जीवनपट सांगताना विचारवंत, लेखक प्राध्यापक...