पोस्ट्स

स्वा रा ती रुग्णालयामार्फत आमदार फंडातुन करण्यात आलेल्या खरेदीतही घोळ ? ..

इमेज
आमदार फंडातून स्वा रा ती रुग्णालयामार्फत करण्यात आलेल्या खरेदीतही घोळ..? विविध मागण्यांसाठी मनसे कडून अधिष्ठातांना निवेदन... अंबाजोगाई(प्रसेनजित आचार्य):- अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात आमदार फंडातून १०० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. परंतु त्या निधीतून खरेदी करण्यात आलेल्या विविध प्रकारच्या मशीन साहित्य ज्या संख्येत घ्यायचे त्यापेक्षा कमी साहित्य घेऊन उर्वरित निधीचा अपहार करण्यात आला असून या आमदार फंड निधीतुन झालेल्या खरेदीची चौकशी करण्यात यावी अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.  या बरोबरच बाहेरील खाजगी मेडिकल वरून जेनेरिक औषधांच्या नावाखाली महागडी औषध विक्री होत असून या खाजगी मेडिकल सोबतचा करार रद्द करण्यात यावा, तसेच संस्थेतील अधिक्षक व उपअधीक्षक ही मंजूर नसलेली पदे तात्काळ निरस्त करून या पदावरील व्यक्तींना मूळ पदस्थापने वर नियुक्त करण्यात यावी, स्वीय प्रपंजी खात्यातून(PLA) लेखशीर्ष बदलून देयके देण्यात आली आहेत, जे महाराष्ट्र कोषागार नियम 1968 प्रमाणे बेकायदेशीर असून या देयकांची चौकशी करून क...

अ.भा.प्रहार न्यायमंच संचालित इ.मा.ब.कल्याण विभाग आश्रमशाळा संघटना लातूर जिल्हा कार्यकारणी जाहीर.

इमेज
अ.भा.प्रहार न्यायमंच संचालित इ.मा.ब.कल्याण विभाग आश्रमशाळा संघटना लातूर जिल्हा कार्यकारणी जाहीर. इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत सुरु असलेल्या निवासी आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सेवा विषयक समस्या जिल्हा स्तरावर मांडण्यासाठी व  सोडवण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रमुख मार्गदर्शनात, संघटनेचे राज्याध्यक्ष महेश डवरे व राज्य सचिव हेमंत मोरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत लातूर जिल्हा कार्यकारणी गठीत करण्यात आली.  कार्यकारणीत जिल्हाध्यक्ष स्थानी बाळासाहेब गाडगे, उपजिल्हाध्यक्ष सत्यवान कांबळे, सचिव काशिनाथ चव्हाण, कार्याध्यक्ष बालाजी दिगंबरराव कतुरे, कोषाध्यक्ष नर्सिंग साहेबराव  देशमुख, संपर्क प्रमुख सय्यद हमीद चाँदसाब, जिल्हासंघटक ऋषीकेश बिराजदार, प्रसिद्धी प्रमुख व्यंकट राठोड, सदस्य संजय आनंदराव चव्हाण, उमाकांत सुरवसे, शरद संपते यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.             बाळासाहेब घाडगे यांची प्रहार शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष पदी  निवड झाल्याबद्दल त्यांचा मराठा कुणबी समाज बांधवांच्या वती...

महात्मा बसवेश्वरांच्या समता प्रेम बंधुता व न्यायाचा संदेश वर स्वीकारा. जगद्गुरु भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामीजी यांचे प्रतिपादन.

इमेज
महात्मा बसवेश्वरांच्या समता प्रेम बंधुता व न्यायाचा संदेश वर स्वीकारा.    जगद्गुरु भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामीजी यांचे प्रतिपादन.  अहमदपूर / प्रतिनिधी मानव विश्वाच्या कल्याणाचा जगत ज्योती महात्मा बसवेश्वरांच्या समता प्रेम बंधूता व न्यायाचा संदेश स्वीकारून संबंध मानवी जीवन कल्याणकारी बनवा असे प्रतिपादन श्नी श्नी श्नी 1008 केदारनाथ रावल रत्न जगदगुरु भिमा शंकरलिंग शिवाचार्य महास्वामी उत्तराखंड उखी मठ यांनी केले. ते शनिवार दि. 5 रोजी नगरपरिषदेच्या आवारात राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज व्यापारी संकुलात जगत ज्योती महात्मा बसवेश्वराच्या अश्वारूढ पुतळ्याच्या भूमिपूजन प्रसंगी आशीर्वचन पर बोलताना व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार बाबासाहेब पाटील होते. व्यासपीठावर श्री राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज, माजी मंत्री बाळासाहेब जाधव, माजी मंत्री विनायकराव पाटील, माजी आमदार बब्रुवान खंदाडे,नगराध्यक्षा आश्वीनीताई कासनाळे,महात्मा बसवेश्वर स्मारक समितीचे अध्यक्ष गणेश हाके पाटील ,सचिव सांबप्पा महाजन ,भाजपा अंपग सेलचे प्रमुख रामदास पाटील, प.स.सभापत...

बाबुराव हिंगणे यांचे दुःखद निधन

इमेज
बाबुराव हिंगणे यांचे दुःखद निधन.      अहमदपूर दि. 0 2.02.22 येथील जुने मशिनरी व्यापारी बाबुराव रामचंद्रआप्पा हिंगणे यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 78व्या वर्षी दिनांक 2 रोजी मंगळवारी रात्री अकरा वाजता लातूरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले.      दि. एक रोजी अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये वीरशैव लिंगायत स्मशानभूमी मध्ये दुपारी बारा वाजता अंतिम संस्कार करण्यात आले.    त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे असा मोठा परिवार असून उद्योजक विनोद हिंगणे यांचे ते वडील होत.      त्यांच्या दुःखात निधनाबद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

शिक्षणक्षेत्रातील समस्यां सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी पूढाकार घ्यावा..! - डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी

इमेज
शिक्षणक्षेत्रातील समस्यां सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी पूढाकार घ्यावा..!   - डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी  अहमदपूर दि.30 शिक्षण क्षेत्रात आज विविध पातळ्यांवर अनेक समस्या निर्माण झाल्या असून त्या समस्या सोडविण्यासाठी शिक्षणक्षेत्रातील जाणकारासह कार्यकर्त्यांनी पूढाकार घ्यावा असे अवाहन युवक नेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी केले. शहरातील अल ईमान मारनाॅरेटी एज्युकेशन सोसायटी च्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप तथा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यां व्यक्तींचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात ते म्हणून बोलत होते.अध्यक्ष स्थानी हाफिज शेख खुर्शीद साब यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहूणे म्हणून जनआंदोलन नेते सूप्रीयभाऊ बनसोडे प्रा.डाॅ. सय्यद अकबरलाला, प्रा.शादूल्लाखान पठाण,सामाजिक कार्यकर्ते संजयभाऊ माळी,सय्यद रब्बानीभाई, खूर्रमखान पठाण,शेख अल्लाउद्दीन शिरूरताजबंद,पत्रकार मेघराज गायकवाड,प्रा.नळेगांवकर आदींची उपस्थिती होती. पूढे बोलताना डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी म्हणाले की,शिक्षण हेच सर्वांगीण विकासाचे माध्यम असून क...

अंबाजोगाई शासकीय धान्य गोदाम रक्षक यांना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी 'क्लीन चिट' दिलीय का?

इमेज
अंबाजोगाई शासकीय धान्य गोदाम रक्षक यांना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी 'क्लीन चिट' दिलीय का..? आमदार नमिताताई मुंदडा यांच्या उपस्थितीत झालेल्या पंचनामा धूळखात पडून... अंबाजोगाई(प्रसेनजित आचार्य): दिनांक १४ नोव्हेंबर रोजी केज विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार मा. निमिता मुंदडा यांनी अचानकपणे अंबाजोगाई येथील शासकीय धान्य गोदामास भेट दिली होती. त्यावेळी गोदमातील धान्याची ६० पोती मोजली असता त्याचे वजन ४७.२०, ४७.५०, ४७.८०, ४८ कीलो ग्राम असल्याचे आढळून आले होते तसा पंचनामा ही ऍड संतोष लोमटे, शेख नूर महंमद हुसेन अमोल पवार, गौरव लामतुरे, अमोल म्हस्के, दक्षता समिती सदस्य बालाजी शेरेकर या उपस्थित पंचांच्या समक्ष करण्यात आला होता. दिनांक १४ नोव्हेंबर रोजीच संबंधित गोदाम रक्षक सुरेश बलूतकर यांना तहसीलदार विपीन पाटील यांनी कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा सादर करण्याचे आदेश ही दिले होते परंतु वेळेत खुलासा सादर न केल्याने मा. तहसीलदार अंबाजोगाई यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना दिनांक १५ नोव्हेंबरलाच शासकीय धान्य गोदाम रक्षक यांच्या कामात कमालीचा हलगर्जीपणा दिसून आल्याचा ठपका ठेवत...

अंबाजोगाई शहरातील 'शिवभोजन' केंद्रांच्या 'थाळी' मधली संपूर्ण डाळ 'काळी'..?

इमेज
अंबाजोगाई शहरातील 'शिवभोजन' केंद्रांच्या 'थाळी' मधली संपूर्ण डाळ 'काळी'..? अंबाजोगाई(प्रसेनजित आचार्य): जानेवारी २०२० मध्ये महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने गोरगरीब, वंचित लोकांसाठी कमी पैशात भोजन मिळावे म्हणून 'शिवभोजन थाळी योजना' सुरू केली. सदर योजना ही मा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू केलेली एक महत्वकांक्षी योजना होय. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर पहिल्या तिमाहीत या योजनेसाठी तब्बल ६ कोटी ४८ लक्ष रुपये खर्च केले. नंतर ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात सुरू करण्यात आली. युती सरकारने सुरू केलेल्या झुणका भाकर योजनेत 1 रुपयात बेसन, भाकर हे जेवण मिळत असे त्या धर्तीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे १० रुपयात 'शिवभोजन थाळी' योजना सुरू करण्यात आली. परंतु अंबाजोगाई शहरातील शिवभोजन केंद्र हे शासनाच्या लुबाडणूक करण्याचे अड्डे बनत चालल्याचे चित्र दिसत असून शहरातील शिवभोजन केंद्रांवर हॉटेल मध्ये चहा पिण्यासाठी आलेल्या लोकांना अगोदरच टेबलावर वाढून ठेवलेल्या थाळी समोर फो...