फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण
*फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण* अहमदपूर/प्रतिनिधी मौलाना अबुल कलाम आज़ाद यांना अगदी लहान वयापासूनच प्रचंड वाचनाची आवड होती.त्यातूनच वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी त्यांनी अल-हिलाल नावाचे वर्तमानपत्र सुरू केले आणि त्यात इंग्रजांच्या विरोधात लेखन केले व भारतीयांना स्वातंत्र्यासाठी प्रेरित केले म्हणून त्यांना इंग्रजांनी तुरूंगात टाकले , असे प्रतिपादन आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले.ते आज सिटी प्लाजा येथे पार पडलेल्या अहमदपूर-चाकूर तालुक्यातील उर्दू माध्यमांच्या शाळेतील विद्यार्थ्यांंच्या वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मोहसीन बायजीद, प्रमुख व्याख्याते म्हणून हैद्राबाद येथील मौलाना अब्दुल क़वीसाहब दामत बरकातहूम,माजी आमदार बब्रुवान खंदाडे, शिवसेना जिल्हाप्रमुख अजित उर्फ बालाजी रेड्डी,काॅंग्रेस आयचे जिल्हा सरचिटणीस सांब महाजन,साजिदभाई मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष सय्यद साजिदभाई,माजी उ...