पोस्ट्स

किनगावात आमदार रोहित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

इमेज
किनगाव येथे आमदार रोहित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर व विविध कार्यक्रम संपन्न अहमदपूर तालुक्यातील किनगांव येथील आमदार रोहित दादा पवार फॅन्स क्लब लातूर जिल्हा यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीरात 35 रक्त दात्यांनी रक्तदान केले या वेळी मास्क. साडी वाटप करण्यात आले. व कोरोना योध्दा म्हणून पत्रकारांना सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम लातूर जिल्हा राष्ट्रवादी पदवीधर चे जिल्हाध्यक्ष केशव माने अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य बाळू मुंढे सरपंच किशोर बापू मुंडे यांच्या हस्ते सत्कार समारंभ संपन्न झाला. असून या प्रसंगी ग्राम पंचायत च्या साफ सफाई कर्मचारी यांना सन्मान पत्र साड़ी मास्क देऊन सन्मानित करण्यात आले. तर या कार्यक्रमाचे आयोजन रोहित दादा पवार फॅन्स क्लब लातूर जिल्हा यांच्या वतीने करण्यात आले होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलदार भाई शेख मन्मथ अप्पा स्वामी प्रभाकर क्षीरसागर. राजकुमार बोडके अफजल मोमीन. अक्षय ठाकूर भगवान ठाकूर. ग्राम पंचायत सदस्य आशू तांबोळी. गणेश पांचाळ. शेळके शिवम. नागराळे सर. तसेच रोहित दादा पवार फॅन्स क्लब चे पद...

वंचित बहुजन आघाडी उदगीरच्या वतिने विविध मागण्यांचे निवेदन - जिल्हा प्रवक्ता डॉ. संजय कांबळे

इमेज
निवेदन प्रति,          उपजिल्हाधिकारी साहेब ,  उपविभागीय कार्यालय, उदगीर       विषय :- खालील मागण्या संदर्भात निवेदन.  महोदय,                वरील विषयास अनुसरुन विनंती की, वंचित बहुजन आघाडी च्या वतीने खालील मागण्याचे निवेदन सादर करीत आहे.    १ ). उदगीर तालुका व शहरातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या लोकांची सर्वे करुन ज्यांच्याकडे राहण्यासाठी जागा आहे. परंतु घर नाही अशा लोकांना रमाई आवास योजना व पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल योजनेचा त्वरित लाभ देण्यात यावा.  २). शहरातील व ग्रामीण भागातील लोकांकडे राशनकार्ड नाही अशा लोकांना त्वरित राशनकार्ड वितरित करण्यात यावे व ज्यांच्या कडे नाही अशा लोकांना व आहे अशा लोकांना अन्न सुरक्षा योजने अंतर्गत राशन देण्यात यावे.  ३). उदगीर तालुक्यातील व शहरातील त्वरित डी. आर. डी चा सर्वे करण्यात यावा.  ४). उदगीर तालुक्यातील ओला दुष्काळ म्हणून जाहीर करण्यात यावा व पंचनामे केलेल्या शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत करण्यात यावी....

महात्मा फुले महाविद्यालय किनगाव येथे शहीद भगतसिंग यांची जयंती साजरी

इमेज
*किनगांवच्या महात्मा फुले महाविद्यालयात शहिद भगतसिंग यांची जयंती साजरी*  किनगांव ( प्रतिनिधी )अहमदपूर तालुक्यातील किनगांवच्या महात्मा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सोमवार दि 28 सप्टेबर रोजी शहिद भगतसिंग यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री छत्रपती शिक्षण संस्थेचे सचिव प्रा डॉ बी आर बोडके , होते तर प्रमुख उपस्थिती प्राचार्य डॉ भारत भदाडे ,कार्यक्रमाधिकारी प्रा बालाजी आचार्य , प्रा संजय जगताप, प्रा. अनंत सोमवंशी, कार्यालयीन अधिक्षक गोपाळ इंद्राळे , उध्दवराव जाधव, प्रा बी व्ही पवार , प्रा डॉ दर्शना कानवटे, याची होती यावेळी संस्था सचिव प्रा डॉ बीआर बोडके यांनी शहिद भगतसिंग याच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन विनम्र ञीवार वंदन केले आणि मार्गदर्शन करताना क्रांतीकारी शहिद भगतसिंग उत्तम दृष्ट्रे होते वयाच्या चोविसाव्या वर्षी हसत हसत देशासाठी फासावर जाऊन प्रखर देशभक्त ठरले त्याच्यामुळेच स्वातंत्र्याची चळवळ प्रखर होऊन देशाला स्वातंत्र्य मिळाले सुखदेव ,राजगुरू, भगतसिंग हुतात्म्याना विनम्र वंदन करतो असेही म्हणा...

तुकाराम वाघमारे यांचा कोरोना योद्धा म्हणुन सन्मान

इमेज
कोरोना काळात उत्कृष्ट कार्य केल्यामुळे  श्री वाघमारे टी जी HA बोरी यांचा  मा ना श्री  धीरज विलासराव देशमुख आमदार ग्रामीण लातूर तर्फे सत्कार करण्यात आला त्यावेळी मा सभापती श्री  पाटील साहेब उपसभापती श्री उपाडे साहेब मा सन्माननीय गट विकास अधिकारी श्री गोडभरले साहेब सन्माननीय तालुका आरोग्य अधिकारी श्री डॉ अशोक सारडा साहेब मा श्री विलास कदम

धनगर समाजाचे किनगाव ग्रामपंचायत समोर "ढोल बजाओ सरकार जगाओ आंदोलन"

इमेज
धनगर समाजाचे ग्रामपंचायत समोर "ढोल बजाओ सरकार जगाओ आंदोलन"  त्रिशरण वाघमारे अहमदपुर प्रतिनिधी  अहमदपुर दि. 25 येथील धनगर समाजाचे ग्रामपंचायत कार्यालय च्या समोर ढोल वाजवून ढोल बजाओ सरकार जगाओ आंदोलन करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत चे सरपंच किशोर मुंडे,ग्रामविकास अधिकारी आर.जी कांबळे यांना निवेदन देऊन धनगर समाजाच्या भावना महाराष्ट्र सरकार ला कळवावे अशी मागणी करण्यात आली, महाराष्ट्र सरकार धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत गंभीर नाही,असे दिसत आहे.त्यामुळे झोपलेल्या सरकारला जागं करण्यासाठी आज महाराष्ट्रभर "ढोल बजाओ...सरकार जगाओ..." आंदोलन करण्यात आले.सरकारने लवकरात लवकर ST चा दाखला द्यावा व धनगर समाजाची न्यायालयात चालू असलेल्या याचिकेला चांगल्या वकिलांची नेमणूक करावी व याचिका जलद गती कोर्टात चालवावी.मागील सरकारने जे आदिवासींना तेच धनगर समाजाला या तत्वावर दिलेले एक हजार कोटी त्वरीत द्यावे ही मागणी निवेदनात करण्यात आली , यावेळी धनराज गिरी, शिवराज भुसाळे ,त्रिशरण वाघमारे,बाळू देवदे,यांनी मनोगत व्यक्त केले, यावेळी,ज्ञानोबा देवदे,नामदेव धरणे,राजू हांडे,भा...

अहमदपुर गोदामपाल यांची चौकशी करा अन्यथा अमरण उपोषण - राजीव मोहगावकर

इमेज
अहमदपूर प्रतिनिधी, अहमदपूर येथील शासकीय धान्य गोदामातील धान्य साठ्याची चौकशी करून संबंधित गोदामपालावर तात्काळ कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते राजीव मोहगावकर यांनी उप विभागीय अधिकारी कार्यालय अहमदपूर समोर आमरण उपोषण करणार असल्याचे लेखी निवेदनाद्वारे उप विभागीय अधिकारी अहमदपूर यांना कळविले आहे. या बाबत सविस्तर असे की, सामाजिक कार्यकर्ते राजीव मोहगावकर यांनी शासकीय गोदामात धान्याचा अपहार होत असुन धान्याचा प्रत्येक गोनीतून ४ ते ५ किलो धान्य काढून घेऊन ते धान्य काळ‍‍‍या बाजारात विकले जात असुन, निवेदनात गोदाम पालाच्या संपत्तीची ही चौकशी करण्यात यावी , धान्य साठ्याची चौकशी करण्यात येऊन संबंधित गोदाम पालावर शासनाची फसवणूक, जनतेच्या धान्याचा अपहार, व जीवन वस्तू अधिनियमातील नवीन तरतुदीनुसार त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी व देश्याची संपत्ती लुटणाऱ्या देशलुटारूवर देशद्रोहाचे ही गुन्हे दाखल करावीत अशी मागणी राजीव मोहगावकर यांनी तहसीलदार अहमदपूर यांना लेखी निवेदनाद्वारे दि. ५/८/२०२० रोजी केली होती, परंतु संबंधित तहसील प्रशासनाने अद्याप कसलीही कार...

मुत्युनंतरचा संघर्ष रुग्ण हक्क संघर्ष समितीने सोडवला

इमेज
*मृत्यू नंतरचा संघर्ष रुग्ण हक्क संघर्ष समितीने सोडवला.. लातुरातील हॉस्पिटल मधील निंदणीय घटना* प्र.लातुर ( त्रिशरण वाघमारे ) आज दि.22 सप्टेंबर 2020 रोजी चंपाबाई नागरगोजे वय 75 वर्षे हे लातुर येथील लोकमान्य अतिदक्षता केंद्र या रुग्णालयात उपचारा दरम्यान मयत झाल्या पैश्या अभावी मृतदेह नातेवाईकांना ताब्यात देण्यासाठी रुग्णालयाने नकार दिला म्हणून रुग्णांचा नातेवाईकांनी रुग्ण हक्क संघर्ष समिती लातुर यांचेकडे मदतीची साथ मागितली त्या अनुषंगाने रुग्ण हक्क संघर्ष समितीचे *ॲड. निलेश करमुडी , प्रशांत चव्हाण , संजयकुमार सुरवसे , हणमंत गोत्राळ,विश्वास कुलकर्णी , रवि बिजलवाड, संतोष सोनवणे , सिद्धु वाडकर, यांनी* तात्काळ लोकमान्य अतिदक्षता केंद्र येथे भेट दिली तिथे गेल्यावर पैश्या अभावी रुग्णालय मृतदेह ताब्यात देत नव्हते व हॉस्पिटलचे बिल हे नियमाप्रमाणे नव्हते व संबंधित रुग्णाची फाईल पण दाखवत नव्हते अशि सत्य परिस्थिती लक्षात आली आसता नेमका हा काय प्रकार आहे हे विचारण्यासाठी रुग्ण हक्क संघर्ष समितीचे ॲड. निलेश करमुडी यांनी संबंधित डॉक्टरांशी चर्चा करणेकरीता डॉक्टरांना बोलवा अशी...