पोस्ट्स

जानेवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शिक्षणक्षेत्रातील समस्यां सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी पूढाकार घ्यावा..! - डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी

इमेज
शिक्षणक्षेत्रातील समस्यां सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी पूढाकार घ्यावा..!   - डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी  अहमदपूर दि.30 शिक्षण क्षेत्रात आज विविध पातळ्यांवर अनेक समस्या निर्माण झाल्या असून त्या समस्या सोडविण्यासाठी शिक्षणक्षेत्रातील जाणकारासह कार्यकर्त्यांनी पूढाकार घ्यावा असे अवाहन युवक नेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी केले. शहरातील अल ईमान मारनाॅरेटी एज्युकेशन सोसायटी च्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप तथा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यां व्यक्तींचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात ते म्हणून बोलत होते.अध्यक्ष स्थानी हाफिज शेख खुर्शीद साब यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहूणे म्हणून जनआंदोलन नेते सूप्रीयभाऊ बनसोडे प्रा.डाॅ. सय्यद अकबरलाला, प्रा.शादूल्लाखान पठाण,सामाजिक कार्यकर्ते संजयभाऊ माळी,सय्यद रब्बानीभाई, खूर्रमखान पठाण,शेख अल्लाउद्दीन शिरूरताजबंद,पत्रकार मेघराज गायकवाड,प्रा.नळेगांवकर आदींची उपस्थिती होती. पूढे बोलताना डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी म्हणाले की,शिक्षण हेच सर्वांगीण विकासाचे माध्यम असून क...

अंबाजोगाई शासकीय धान्य गोदाम रक्षक यांना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी 'क्लीन चिट' दिलीय का?

इमेज
अंबाजोगाई शासकीय धान्य गोदाम रक्षक यांना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी 'क्लीन चिट' दिलीय का..? आमदार नमिताताई मुंदडा यांच्या उपस्थितीत झालेल्या पंचनामा धूळखात पडून... अंबाजोगाई(प्रसेनजित आचार्य): दिनांक १४ नोव्हेंबर रोजी केज विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार मा. निमिता मुंदडा यांनी अचानकपणे अंबाजोगाई येथील शासकीय धान्य गोदामास भेट दिली होती. त्यावेळी गोदमातील धान्याची ६० पोती मोजली असता त्याचे वजन ४७.२०, ४७.५०, ४७.८०, ४८ कीलो ग्राम असल्याचे आढळून आले होते तसा पंचनामा ही ऍड संतोष लोमटे, शेख नूर महंमद हुसेन अमोल पवार, गौरव लामतुरे, अमोल म्हस्के, दक्षता समिती सदस्य बालाजी शेरेकर या उपस्थित पंचांच्या समक्ष करण्यात आला होता. दिनांक १४ नोव्हेंबर रोजीच संबंधित गोदाम रक्षक सुरेश बलूतकर यांना तहसीलदार विपीन पाटील यांनी कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा सादर करण्याचे आदेश ही दिले होते परंतु वेळेत खुलासा सादर न केल्याने मा. तहसीलदार अंबाजोगाई यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना दिनांक १५ नोव्हेंबरलाच शासकीय धान्य गोदाम रक्षक यांच्या कामात कमालीचा हलगर्जीपणा दिसून आल्याचा ठपका ठेवत...

अंबाजोगाई शहरातील 'शिवभोजन' केंद्रांच्या 'थाळी' मधली संपूर्ण डाळ 'काळी'..?

इमेज
अंबाजोगाई शहरातील 'शिवभोजन' केंद्रांच्या 'थाळी' मधली संपूर्ण डाळ 'काळी'..? अंबाजोगाई(प्रसेनजित आचार्य): जानेवारी २०२० मध्ये महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने गोरगरीब, वंचित लोकांसाठी कमी पैशात भोजन मिळावे म्हणून 'शिवभोजन थाळी योजना' सुरू केली. सदर योजना ही मा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू केलेली एक महत्वकांक्षी योजना होय. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर पहिल्या तिमाहीत या योजनेसाठी तब्बल ६ कोटी ४८ लक्ष रुपये खर्च केले. नंतर ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात सुरू करण्यात आली. युती सरकारने सुरू केलेल्या झुणका भाकर योजनेत 1 रुपयात बेसन, भाकर हे जेवण मिळत असे त्या धर्तीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे १० रुपयात 'शिवभोजन थाळी' योजना सुरू करण्यात आली. परंतु अंबाजोगाई शहरातील शिवभोजन केंद्र हे शासनाच्या लुबाडणूक करण्याचे अड्डे बनत चालल्याचे चित्र दिसत असून शहरातील शिवभोजन केंद्रांवर हॉटेल मध्ये चहा पिण्यासाठी आलेल्या लोकांना अगोदरच टेबलावर वाढून ठेवलेल्या थाळी समोर फो...

शालेय व्यवस्थापन समिती गंगाहिप्परगा येथे अध्यक्ष स्थानी.... बाबुराव सूर्यवंशी यांची निवड

इमेज
शालेय व्यवस्थापन समिती गंगाहिप्परगा येथे अध्यक्ष स्थानी.... बाबुराव सूर्यवंशी यांची निवड      अहमदपूर प्रतिनिधी दि..                   जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा गंगाहिप्परगा येथील शालेय व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली या समितीवर गावातील सर्व पालक व विद्यार्थी उपस्थित होते तसेच या समिती मध्ये गावातील सरपंच सुखदेव राव कदम यांच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य यांची देखील उपस्थिती होती तसेच शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बाबूराव सूर्यवंशी तर उपाध्यक्षपदी सुभाष तेलंगे, तसेच मिराबाई विठ्ठल भोईनवाड( सदस्या),शिवानी उमेश व्हुंनगुंडे (सदस्या), तुकाराम बापुराव कदम(सदस्य), प्रल्हाद धोंडीबा सुरकुटे(सदस्य), मुरलीधर बापुराव कदम (सदस्य),प्रकाश देवकते (सदस्य), सिताराम फाजगे(सदस्य),अर्चना ज्ञानोबा राजपंगे(सदस्या),संजना गवळे(सदस्या),मिराबाई कोमले(सदस्या),सोनबा कदम(सदस्य),गोपाळ श्रीराम फाजगे(सदस्य), संगिता देवकते(ग्रा.सदस्या), अवनी कदम (विद्यार्थी प्रति...

श्रीराम फायनान्स कंपनी' कडून ग्राहकाची फसवणूक..?

इमेज
'श्रीराम फायनान्स कंपनी' कडून ग्राहकाची फसवणूक..? सिरसाळा(प्रतिनिधी):- 2019 मध्ये लिलावात घेतलेल्या ट्रक बाबतीत फसवणूक झाल्याची तक्रार करत 'श्रीराम फायनान्स' विरोधात दिलीप सातपुते यांनी लेखी तक्रार सिरसाळा पोलिसात दाखल केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की 2019 मध्ये मुंबई येथे झालेल्या एका लिलावात दिलीप सातपुते यांनी एक १२ टायर गाडी १४ लक्ष रुपयांना लिलावात ठरवली. श्रीराम फायनान्स कं. ली. च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी रोख पाच लाख रुपये जमा हि केले व उर्वरित रक्कम रुपये नऊ लाख गाडी नावावर झाल्यानंतर गाडीवर लोन करून फेडण्याचे ठरले. गाडी नावे करून देण्याचे सांगत श्रीराम फायनान्स कंपनीकडून सर्व कागदोपत्री व्यवहार अंबाजोगाई शाखेत पूर्ण ही करून घेतला परंतु गाडी मात्र सातपुते यांच्या नावावर झाली नाही. अचानक सातपुते यांच्या अंबाजोगाई पीपल्स बँकेच्या सिरसाळा शाखेच्या खात्यातील जवळजवळ ३५ हजार एवढी रक्कम श्रीराम फायनान्स कंपनी कडून कपात करण्यात आली असल्याचे लक्षात आल्याने गाडी नावावर झाली नसुन सुद्धा पैसे कपात कसे झाले अशी विचारणा सातपुते यांनी क...

फक्त आश्वासनांवर आश्वासनं,कारवाई मात्र शून्य,राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांचे पाचशे अस्थायी सहाय्यक प्राध्यापक बेमुदत सामूहिक रजेवर

इमेज
फक्त आश्वासनांवर आश्वासनं,कारवाई मात्र शून्य, राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांचे पाचशे अस्थायी सहाय्यक प्राध्यापक बेमुदत सामूहिक रजेवर... अंबाजोगाई: महाविकास आघाडी सरकार तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या कडून देण्यात येणाऱ्या आश्वासनांना कंटाळून दि ११ पासून स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांसह राज्यभरातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांचे अस्थायी सहाय्यक प्राध्यापक बेमुदत सामूहिक रजेवर जात आहेत. आजवर कोविड १९ सारख्या भीषण महामारीत फ्रंटलाईन वर्कर म्हणून ज्या डॉक्टरांनी अहोरात्र सेवा दिली, अनेकांना जीवनदान दिले,ना वेळ पहिला ना काळ, ज्यांनी स्वतःला रुग्णसेवेत झोकून दिलं त्यांच्यावर कायम सेवेत सामावून घेण्यासाठी आंदोलन किंवा लक्षणिक उपोषणं करावी लागतात, ही पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने झुकवणारी घटना आहे. सेवा नियमित करण्यासंदर्भात यापूर्वीही शासनाकडून बऱ्याच वेळा आश्वाशीत करण्यात आले होते.या सर्व सहाय्यक प्राध्याकांना नोव्हेंबर 2020 मध्ये मा. ना. अमित देशमुख वैद्यकीय शिक्षणमंत्री यांच्या दालनात झालेल्या बै...

अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालयात जिजाऊ जयंती निमित्त सेवानिवृत्त महिला शिक्षकांचा सत्कार

इमेज
अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालयात जिजाऊ जयंती निमित्त सेवानिवृत्त महिला शिक्षकांचा सत्कार .. अहमदपुर:- दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जयहिंद प्रयाग प्राथ.व अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन वंदन करण्यात आले. दरवर्षी यांच्या जयंती निमित्त भव्य शोभायाञेचे आयोजन करण्यात येते पण मागील दोन वर्षापासुन कोरोनाचे संकट असल्यामुळे यावर्षी वेगळ्या पध्दतीने जिजामाता ज्ञानप्रसारक मंडळाच्या वतीने शिक्षण क्षेञात उल्लेखनिय कार्य करुन सेवानिवृत झालेल्या सरस्वती प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती जिजाबाई मोरे व जि.प.प्रा.शाळा सलगरा अंतर्गत सुरु असलेल्या अंगणवाडीत सेवा करुन सेवानिवृत झालेल्या श्रीमती प्रभावती ग्यानोबा कोडगीरे या दोन्ही महिलांचा शाल श्रीफळ साडीचोळी व सन्मानचिन्ह देवुन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेच्या सचिव पुष्पाताई कोडगिरे व प्रमुख पाहुणे शिवराज माने,बालासाहेब मोरे,सेवानिवृत मुख्याध्यापक धनराज पाटील हे होते.कार्यक्रमाचे प्रस्ताविक अहिल्यादेवी होळकर ...

यशवंत विद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी.

इमेज
यशवंत विद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी.      अहमदपूर दि. 12. 01. 22 येथील यशवंत विद्यालयांमध्ये त्याला राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या फोटोंना पुष्पहार मुख्याध्यापक व्ही व्ही गंपले यांच्या हस्ते अर्पण करून अभिवादन करण्यात आले.      यावेळी मुख्याध्यापकानी राष्ट्रमाता जिजाऊ आणि युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला यावेळी उपमुख्याध्यापक रमाकांत कोंडलवाडे, पर्यवेक्षक उमाकांत नरडेले, दिलीप गुळवे, प्रा. शिवशंकर पाटील, जी.जे. सिरसागर, सुनील धनुरे सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.      कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामलिंग तत्तापूरे यांनी सूत्रसंचलन राजकुमार पाटील यांनी तर आभार प्रवीण मोरे यांनी मानले सदरचा शालेय उपक्रम शासनाच्या कोरणा चे सर्व नियम पाळून करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

शिष्यवृत्ती परीक्षेत यशवंत विद्यालयाचे 22 विद्यार्थी. शिष्यवृत्तीधारकराज्याच्या गुणवत्ता यादीत आठवीची आर्या देशमुख.

इमेज
शिष्यवृत्ती परीक्षेत यशवंत विद्यालयाचे 22 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक राज्याच्या गुणवत्ता यादीत आठवीची आर्या देशमुख अहमदपूर दि.09.01.22 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने माहे ऑगस्ट 2021 मध्ये घेण्यात आलेल्या आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत 15 विद्यार्थी तर पाचवी पूर्व उच्च प्राथमिक परीक्षेत 07 विद्यार्थी असे एकूण 22 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले असून यशाची नेत्रदीपक परंपरा कायम केली आहे.   त्यात आठवी वर्गाचे आर्या मोहनराव देशमुख-258 गुण घेऊन राज्याच्या यादीत 24वी, जिल्हा यादीत 2री व तालुक्यातून प्रथम, सृष्टी शिवशंकर पाटील-240 गुण घेऊन जिल्ह्यातून 8 वी, गुट्टे किरण मारुती-230 जिल्ह्यातून 17वा , हेमनर सुरज संदीप-228 गुण घेऊन जिल्ह्यातून अठरावा, जोशी अभिषेक मकरंद राव-222 गुण, इप्पर अंकिता राजेंद्र-216, केंद्रे अनिकेत संतोषराव-214 , गुरमे ज्ञानेश्वर ईश्वर-206, भाळे संध्याराणी मुंजारी-204, केंद्रे स्नेहा संजय-196 ,नागरगोजे अंजली शिवराज-194 ,पवार वेदांत नामदेव-190,डोंगरे सौख्या अभिजीत-190 , मुळे प्रतिभा गोविंद-190 , कांबळे आदित्‍य उत्तम-186 , ...

यशवंत विद्यालयात लसीकरणपंधरा ते अठरा वयोगटाच्या विद्यार्थ्यांनी लसीकरणात सहभागी व्हावे. तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांचे आव्हान.

इमेज
यशवंत विद्यालयात लसीकरण पंधरा ते अठरा वयोगटाच्या विद्यार्थ्यांनी लसीकरणात सहभागी व्हावे.      तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांचे आव्हान.     अहमदपूर दि.06.01. 22 सबंध देशातील शालेय विद्यार्थ्यांचे कोरोना काळात आरोग्य चांगले रहावे यासाठी शासनाच्या वतीने मोफत 15 ते 18 वयोगटातील युवक-युवतींनी या लसीकरण सोहळ्यात सहभागी व्हावे असे जाहीर आव्हान तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी केले.       ते दि. 6 रोजी यशवंत विद्यालयात ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरण सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट शिक्षण अधिकारी बबनराव ढोकाडे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील दासरे ,नगर परिषदेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे, डॉ. प्रविण भोसले, डॉ. शुभांगी सुडे ,डॉ. राजेश्री सोळंके, व्ही व्ही गंपले पर्यवेक्षक उमाकांत नरडेँले, दिलीप गुळवे सह मान्यवर उपस्थित होते.      दहाव्या वर्गाचे अभिजीत पाटील या युवकाला लस देऊन लसीकरणाच्या सोहळ्याचा आरंभ करण्यात आला कार्यक्रमाच्या शुभारंभ प...

स्वा रा ती रुग्णालय, अंबाजोगाई येथे औषधांचा कृत्रिम तुटवडा..?फक्त पित्तनाशक पँटाप्राझोल गोळीवरच दवाखाना चालतो काय..?

इमेज
अंबाजोगाई : स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच अभ्यागत मंडळाची बैठक पार पडली. सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन  धनंजय मुंडे यांनी संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत औषध गोळ्या, ऑक्सिजनसह इतर कोणत्याही गोष्टींची कमी पडू देणार नाही, असा शब्द दिला खरा. पण, ही औषधे गोरगरिबांना बाह्यरुग्ण विभागातील मेडिकलवर उपलब्ध असतील किंवा नाही याबद्दल मात्र जनतेच्या मनात साशंकताच आहे. याचे कारण असे की या रुग्णांना काही मोजकी औषधं सोडली तर कोणत्याही प्रकारच्या गोळ्या किंवा औषध मिळत नाहीत. आशिया खंडातील गोरगरीब लोकांचे ग्रामीण रुग्णालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वा.रा.ती रुग्णालयामध्ये अतिशय माफक दरात उपचार मिळेल. या आशेवर दररोज विविध आजारांनी पीडित हजारोच्या संख्येने रुग्ण बाह्यरुग्ण विभागात येतात. त्यांच्यापैकी काही रुग्ण हे गंभीर स्वरूपाच्या आजाराने ग्रस्त अथवा कुठल्या शस्त्रक्रियेसाठी आले असल्याने दवाखान्यातील आंतररुग्ण विभागात त्यांना दाखल करून घेतले जाते. मुख्य आंतररुग्ण विभाग असलेल्या येथे दोन इमारती...

प्रा. बालाजी कारामुंगीकर यांना पी एचडी मिळाल्याबद्दल ओम शांती केंद्राच्या वतीने सत्कार संपन्न.

इमेज
प्रा. बालाजी कारामुंगीकर यांना पी एचडी मिळाल्याबद्दल ओम शांती केंद्राच्या वतीने सत्कार संपन्न.      अहमदपूर दि. 05.01.22 यशवंत कनिष्ठ महाविद्यालयाचे हिंदी विभागाचे प्रमुख प्रा. बालाजी कारामुंगी कर यांना हिंदी विषयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने नुकतीच पीएचडी मिळाल्याबद्दल त्यांचा ओम शांती विश्वविद्यालयाच्या प्रमुख छाया बहिणजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.      यावेळी शासनाचा सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार विजेत्या आशा रोडगे, रामलिंग तत्ता पुरे,तुकाराम साबणे सह केंद्राच्या साधक , साधिका व मित्रपरिवार उपस्थित होते.

शिक्षकासाठी विभागीय स्तरावर कथाकथन स्पर्धेचे आयोजन, अध्यक्षा कल्पनाताई हेलसकर यांचे शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन

इमेज
.    शिक्षकांनी सहभागी व्हावे साने गुरुजी कथामालेचे चा उपक्रम या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आव्हान संयोजक तथा अध्यक्षा श्रीमती कल्पनाताई दत्तात्रय हेलसकर यांनी केले आहे.      अहमदपूर दि.03.01.2022 पूज्य साने गुरुजी जयंतीचे औचित्य साधून आखिल भारतीय कथामाला हेलस शाखे तर्फे शिक्षकासाठी मराठवाडास्तरीय विभागीय कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती अध्यक्षा तथा संयोजिका श्रीमती कल्पनाताई दत्तात्रय हेलसकर यांनी दिली.      स्वर्गीय दत्तात्रय हेलसकर यांनी 1994 मध्ये स्थापन केलेल्या सानेगुरुजी कथामालेच्या हेलस शाखेतर्फे विद्यार्थ्यांच्या सह शिक्षकासाठी ही अनेकविध संस्कारक्षम, शैक्षणिक ,सामाजिक, विधायक उपक्रम राबविले जातात विभागीय कथाकथन स्पर्धेचे हे चौथे वर्ष असून प्रवेश मोफत आहे.कथा मराठी भाषेत असावी. सर्व माध्यमांच्या शाळेतील शिक्षकासाठी स्पर्धा खुली आहे.     विजेत्यांना रोख पारितोषक सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व ग्रंथ भेट देऊन गौरव करण्यात येणार असून सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय स्पर्...

यशवंत विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेना विनम्र अभिवादन. "स्त्री शिक्षणाची जननी सावित्रीबाई फुले " मुख्याध्यापक व्ही व्ही गंपले यांचे प्रतिपादन.

इमेज
यशवंत विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेना विनम्र अभिवादन   स्त्री शिक्षणाची जननी सावित्रीबाई फुले    मुख्याध्यापक व्ही व्ही गंपले यांचे प्रतिपादन       अहमदपूर दिनांक 3.1 .2022 सबंध देशातील महिलांना हिम्मत व संरक्षण देऊन त्यांना शिक्षण देण्याच महत्त्वपूर्ण काम त्यांनी केलं म्हणून त्या स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आहेत असे प्रतिपादन मुख्याध्यापक व्ही व्ही गंपले यांनी केले.     ते दिनांक 3 रोजी यशवंत विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी अभिवादन सोहळ्यात बोलताना व्यक्त केले यावेळी पुढे बोलताना श्रीयुत गंपले म्हणाले की स्त्री ची परिवारातील, समाजातील भूमिका अत्यंत महत्त्वाची व दिशादर्शक आहे त्यामुळे सर्वच स्तरावर महिलांचा व मुलींच्या सन्मान करा असे सांगितले.      प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक व महिला शिक्षकांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले प्रास्ताविक रामलिंग तत्तापुरे यांनी सूत्रसंचालन वर्...