संविधान दिनाला राष्ट्रीय उत्सवाचा दर्जा देऊन सर्व राज्यातील माध्यमिक शिक्षणात संविधानाचा समावेश करावा.:- भाऊसाहेब कांबळे
संविधान दिनाला राष्ट्रीय उत्सवाचा दर्जा देऊन सर्व राज्यातील माध्यमिक शिक्षणात संविधानाचा समावेश करावा.:- भाऊसाहेब कांबळे मुंबई : सर्व राज्यातील सरकारने भारतीय संविधान माध्यमिक शिक्षणात सक्तीने शिकवावे. या तत्कालीन सरकारने ही मागणी पूर्ण करावी अशी अपेक्षा युथ पॅंथर राष्ट्रीय अध्यक्ष मा. भाऊसाहेब कांबळे यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र तसे इत्तर राज्यामध्ये बेरोजगारी बरोबरच गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेन दिवस वाढत चालले आहे. असंख्य गुन्हे दिवसेनदिवस घडत आहेत. जातीय अत्याचाराची मालीका थांबतां थांबत नाही. युवा वर्ग कळत नकळत गुन्हेगारी क्षेत्राकडे आकर्षित होत आहे. ह्या देशाचे भवितव्य लक्षात घेता कायद्याचा अभ्यास मुलांच्या मनावर बिंबवने अत्यंत महत्वाचे आहे. संविधान जनजागृती अभियान व्यापक स्वरूपात आणण्यासाठी संविधान शिक्षण घेणे फार महत्वाचे असल्यामुळे 5 वि ते 10 च्या शालेय अभ्यासक्रमात हा विषय शिकवणीत घेण्यात यावा. यासाठी सर्व सामाजिक संघटना तसेच राजकीय पक्षानी स...