पोस्ट्स

सप्टेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

किनगावात आमदार रोहित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

इमेज
किनगाव येथे आमदार रोहित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर व विविध कार्यक्रम संपन्न अहमदपूर तालुक्यातील किनगांव येथील आमदार रोहित दादा पवार फॅन्स क्लब लातूर जिल्हा यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीरात 35 रक्त दात्यांनी रक्तदान केले या वेळी मास्क. साडी वाटप करण्यात आले. व कोरोना योध्दा म्हणून पत्रकारांना सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम लातूर जिल्हा राष्ट्रवादी पदवीधर चे जिल्हाध्यक्ष केशव माने अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य बाळू मुंढे सरपंच किशोर बापू मुंडे यांच्या हस्ते सत्कार समारंभ संपन्न झाला. असून या प्रसंगी ग्राम पंचायत च्या साफ सफाई कर्मचारी यांना सन्मान पत्र साड़ी मास्क देऊन सन्मानित करण्यात आले. तर या कार्यक्रमाचे आयोजन रोहित दादा पवार फॅन्स क्लब लातूर जिल्हा यांच्या वतीने करण्यात आले होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलदार भाई शेख मन्मथ अप्पा स्वामी प्रभाकर क्षीरसागर. राजकुमार बोडके अफजल मोमीन. अक्षय ठाकूर भगवान ठाकूर. ग्राम पंचायत सदस्य आशू तांबोळी. गणेश पांचाळ. शेळके शिवम. नागराळे सर. तसेच रोहित दादा पवार फॅन्स क्लब चे पद...

वंचित बहुजन आघाडी उदगीरच्या वतिने विविध मागण्यांचे निवेदन - जिल्हा प्रवक्ता डॉ. संजय कांबळे

इमेज
निवेदन प्रति,          उपजिल्हाधिकारी साहेब ,  उपविभागीय कार्यालय, उदगीर       विषय :- खालील मागण्या संदर्भात निवेदन.  महोदय,                वरील विषयास अनुसरुन विनंती की, वंचित बहुजन आघाडी च्या वतीने खालील मागण्याचे निवेदन सादर करीत आहे.    १ ). उदगीर तालुका व शहरातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या लोकांची सर्वे करुन ज्यांच्याकडे राहण्यासाठी जागा आहे. परंतु घर नाही अशा लोकांना रमाई आवास योजना व पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल योजनेचा त्वरित लाभ देण्यात यावा.  २). शहरातील व ग्रामीण भागातील लोकांकडे राशनकार्ड नाही अशा लोकांना त्वरित राशनकार्ड वितरित करण्यात यावे व ज्यांच्या कडे नाही अशा लोकांना व आहे अशा लोकांना अन्न सुरक्षा योजने अंतर्गत राशन देण्यात यावे.  ३). उदगीर तालुक्यातील व शहरातील त्वरित डी. आर. डी चा सर्वे करण्यात यावा.  ४). उदगीर तालुक्यातील ओला दुष्काळ म्हणून जाहीर करण्यात यावा व पंचनामे केलेल्या शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत करण्यात यावी....

महात्मा फुले महाविद्यालय किनगाव येथे शहीद भगतसिंग यांची जयंती साजरी

इमेज
*किनगांवच्या महात्मा फुले महाविद्यालयात शहिद भगतसिंग यांची जयंती साजरी*  किनगांव ( प्रतिनिधी )अहमदपूर तालुक्यातील किनगांवच्या महात्मा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सोमवार दि 28 सप्टेबर रोजी शहिद भगतसिंग यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री छत्रपती शिक्षण संस्थेचे सचिव प्रा डॉ बी आर बोडके , होते तर प्रमुख उपस्थिती प्राचार्य डॉ भारत भदाडे ,कार्यक्रमाधिकारी प्रा बालाजी आचार्य , प्रा संजय जगताप, प्रा. अनंत सोमवंशी, कार्यालयीन अधिक्षक गोपाळ इंद्राळे , उध्दवराव जाधव, प्रा बी व्ही पवार , प्रा डॉ दर्शना कानवटे, याची होती यावेळी संस्था सचिव प्रा डॉ बीआर बोडके यांनी शहिद भगतसिंग याच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन विनम्र ञीवार वंदन केले आणि मार्गदर्शन करताना क्रांतीकारी शहिद भगतसिंग उत्तम दृष्ट्रे होते वयाच्या चोविसाव्या वर्षी हसत हसत देशासाठी फासावर जाऊन प्रखर देशभक्त ठरले त्याच्यामुळेच स्वातंत्र्याची चळवळ प्रखर होऊन देशाला स्वातंत्र्य मिळाले सुखदेव ,राजगुरू, भगतसिंग हुतात्म्याना विनम्र वंदन करतो असेही म्हणा...

तुकाराम वाघमारे यांचा कोरोना योद्धा म्हणुन सन्मान

इमेज
कोरोना काळात उत्कृष्ट कार्य केल्यामुळे  श्री वाघमारे टी जी HA बोरी यांचा  मा ना श्री  धीरज विलासराव देशमुख आमदार ग्रामीण लातूर तर्फे सत्कार करण्यात आला त्यावेळी मा सभापती श्री  पाटील साहेब उपसभापती श्री उपाडे साहेब मा सन्माननीय गट विकास अधिकारी श्री गोडभरले साहेब सन्माननीय तालुका आरोग्य अधिकारी श्री डॉ अशोक सारडा साहेब मा श्री विलास कदम

धनगर समाजाचे किनगाव ग्रामपंचायत समोर "ढोल बजाओ सरकार जगाओ आंदोलन"

इमेज
धनगर समाजाचे ग्रामपंचायत समोर "ढोल बजाओ सरकार जगाओ आंदोलन"  त्रिशरण वाघमारे अहमदपुर प्रतिनिधी  अहमदपुर दि. 25 येथील धनगर समाजाचे ग्रामपंचायत कार्यालय च्या समोर ढोल वाजवून ढोल बजाओ सरकार जगाओ आंदोलन करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत चे सरपंच किशोर मुंडे,ग्रामविकास अधिकारी आर.जी कांबळे यांना निवेदन देऊन धनगर समाजाच्या भावना महाराष्ट्र सरकार ला कळवावे अशी मागणी करण्यात आली, महाराष्ट्र सरकार धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत गंभीर नाही,असे दिसत आहे.त्यामुळे झोपलेल्या सरकारला जागं करण्यासाठी आज महाराष्ट्रभर "ढोल बजाओ...सरकार जगाओ..." आंदोलन करण्यात आले.सरकारने लवकरात लवकर ST चा दाखला द्यावा व धनगर समाजाची न्यायालयात चालू असलेल्या याचिकेला चांगल्या वकिलांची नेमणूक करावी व याचिका जलद गती कोर्टात चालवावी.मागील सरकारने जे आदिवासींना तेच धनगर समाजाला या तत्वावर दिलेले एक हजार कोटी त्वरीत द्यावे ही मागणी निवेदनात करण्यात आली , यावेळी धनराज गिरी, शिवराज भुसाळे ,त्रिशरण वाघमारे,बाळू देवदे,यांनी मनोगत व्यक्त केले, यावेळी,ज्ञानोबा देवदे,नामदेव धरणे,राजू हांडे,भा...

अहमदपुर गोदामपाल यांची चौकशी करा अन्यथा अमरण उपोषण - राजीव मोहगावकर

इमेज
अहमदपूर प्रतिनिधी, अहमदपूर येथील शासकीय धान्य गोदामातील धान्य साठ्याची चौकशी करून संबंधित गोदामपालावर तात्काळ कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते राजीव मोहगावकर यांनी उप विभागीय अधिकारी कार्यालय अहमदपूर समोर आमरण उपोषण करणार असल्याचे लेखी निवेदनाद्वारे उप विभागीय अधिकारी अहमदपूर यांना कळविले आहे. या बाबत सविस्तर असे की, सामाजिक कार्यकर्ते राजीव मोहगावकर यांनी शासकीय गोदामात धान्याचा अपहार होत असुन धान्याचा प्रत्येक गोनीतून ४ ते ५ किलो धान्य काढून घेऊन ते धान्य काळ‍‍‍या बाजारात विकले जात असुन, निवेदनात गोदाम पालाच्या संपत्तीची ही चौकशी करण्यात यावी , धान्य साठ्याची चौकशी करण्यात येऊन संबंधित गोदाम पालावर शासनाची फसवणूक, जनतेच्या धान्याचा अपहार, व जीवन वस्तू अधिनियमातील नवीन तरतुदीनुसार त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी व देश्याची संपत्ती लुटणाऱ्या देशलुटारूवर देशद्रोहाचे ही गुन्हे दाखल करावीत अशी मागणी राजीव मोहगावकर यांनी तहसीलदार अहमदपूर यांना लेखी निवेदनाद्वारे दि. ५/८/२०२० रोजी केली होती, परंतु संबंधित तहसील प्रशासनाने अद्याप कसलीही कार...

मुत्युनंतरचा संघर्ष रुग्ण हक्क संघर्ष समितीने सोडवला

इमेज
*मृत्यू नंतरचा संघर्ष रुग्ण हक्क संघर्ष समितीने सोडवला.. लातुरातील हॉस्पिटल मधील निंदणीय घटना* प्र.लातुर ( त्रिशरण वाघमारे ) आज दि.22 सप्टेंबर 2020 रोजी चंपाबाई नागरगोजे वय 75 वर्षे हे लातुर येथील लोकमान्य अतिदक्षता केंद्र या रुग्णालयात उपचारा दरम्यान मयत झाल्या पैश्या अभावी मृतदेह नातेवाईकांना ताब्यात देण्यासाठी रुग्णालयाने नकार दिला म्हणून रुग्णांचा नातेवाईकांनी रुग्ण हक्क संघर्ष समिती लातुर यांचेकडे मदतीची साथ मागितली त्या अनुषंगाने रुग्ण हक्क संघर्ष समितीचे *ॲड. निलेश करमुडी , प्रशांत चव्हाण , संजयकुमार सुरवसे , हणमंत गोत्राळ,विश्वास कुलकर्णी , रवि बिजलवाड, संतोष सोनवणे , सिद्धु वाडकर, यांनी* तात्काळ लोकमान्य अतिदक्षता केंद्र येथे भेट दिली तिथे गेल्यावर पैश्या अभावी रुग्णालय मृतदेह ताब्यात देत नव्हते व हॉस्पिटलचे बिल हे नियमाप्रमाणे नव्हते व संबंधित रुग्णाची फाईल पण दाखवत नव्हते अशि सत्य परिस्थिती लक्षात आली आसता नेमका हा काय प्रकार आहे हे विचारण्यासाठी रुग्ण हक्क संघर्ष समितीचे ॲड. निलेश करमुडी यांनी संबंधित डॉक्टरांशी चर्चा करणेकरीता डॉक्टरांना बोलवा अशी...

अय्याज पठाण यांचे न.प. विरोधात अमरण उपोषण

इमेज
न.प.अहमदपुर कर्मचारी श्री बिलापट्टे व उपजिल्हाधिकारी श्री शिवणे यांच्या विरोधात अमरण उपोषण लातुर प्र. : पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून बेकायदेशीरपणे नमुना नं आठ अ रजिस्टरला घेण्यात आलेल्या नोंदी तत्काळ रद्द करून सदर नोंदी घेण्यास मदत करणारे न.प. अहमदपुरचे कर्मचारी व न.प. प्रशासन लातुर येथील कर्मचाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे नोंद करून त्यांना निलंबित करावे या मागणीसाठी अहमदपुर येथील रहिवाशी अय्याज पठाण हे दि. 14/9 पासून अमरण उपोषणास बसले आहेत    याबाबत सविस्तर वृत्त असे की पठाण अय्याज यांनी दि.3/9 रोजी प्रशासनास लेखी निवेदन दिले की न.प. अहमदपुर चे कर्मचरि श्री सतिष बिलापट्टे यांनी अहमदपुर येथील मालमत्ता क्र. ए -291 ची नोंद बेकायदेशीर पणे पाच रुपयाच्या बाँड पेपरवर सन 2016 साली 1989 च्या रेकॉर्डला नोंद घेऊन नमुना नं८ अ तयार करून दिला . सदरचा नमुना नं८ अ बेकायदेशीर असल्याने तो रद्द करण्याबाबत प्रशासनाला वारंवार तक्रारी देऊन ही कार्यवाही करण्यात आलेली नसल्याने न.प. कर्मचारी व प्रशासनाच्या विरोधात अय्याज पठाण दि.१४/९ पासून अमरण उपोषणास बसले आहेत ...

शिवक्रांती युवा संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी भुजंग उगीले यांची निवड

इमेज
शिवक्रांती युवा संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी भुजंगराव उगीले  लातुर (प्र. त्रिशरण वाघमारे ) लातुर जिल्हयातील सामाजीक कार्यात आपला वेगळा ठसा उमटवनारे अहमदपुर तालुक्याचे भुमिपुत्र भुजंगराव उगीले यांना शिवक्रांती युवा संघटनेच्या मराठवाडा अध्यक्ष पदी नियुक्त करण्यात आले आहे     याबाबत सविस्तर वृत्त असे की श्री उगीले यांनी जनसामान्यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी जीवाचं रान करत वेळप्रसंगी अधिकाऱ्यांना हात जोडत तर कधी हातचा दाखवत सामान्यांचे प्रश्न मार्गी लावल्याने फक्त तालुक्यातच नव्हे तर जिल्हयातील सामाजीक क्षेत्रात वेगळा ठसा उमटवला. त्यांच्या या कार्याची दखल घेत शिवक्रांती युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. दत्तात्र्य काळे यांनी शिवक्रांतीच्या मराठवाडा अध्यक्षपदाची जबाबदारी श्री. उगीले यांच्यावर सोपवली. यावेळी बोलताना ते म्हणाले की मा. काळे साहेबांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत समाजाच्या हितासाठी आम्ही सदैव तत्पर राहु . त्यांच्या या निवडीबद्दल ओम भाऊ पुणे , राजीव मोहगावकर , कुमार देशपांडे यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या...

मनसेच्या वतीने किनगावात रास्ता रोको

इमेज
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मनसे आक्रमक  किनगांव येथे रास्ता रोको लातुर प्र. किनगाव येथे मनसेच्या वतिने शेतीपंपाची विजबिल माफी व ऐन काढणीच्या वेळी पावसाने झालेली सोयाबीनची नुकसान भरपाई पहाणी करून शेतकऱ्यांना देण्यात यावी . याविषयीचे निवेदन महसुल प्रशासन व पोलीस प्रशासनाला देण्यात आले.       याबाबत सविस्तर वृत्त असे की मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसींग भिकाने , जिल्हा उपाध्यक्ष राजीव मोहगावकर , भुजंगराव उगीले यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांची लाऊडाऊनच्या काळातील विज बिल माफ करण्यात यावे , व तसेच ऐेन काढणीच्या काळात पावसाला सुरवात झाल्याने हातात आलेले सोयाबिनचे पीक हातातुन गेल्याने शेतकऱ्यांना हेक्टरी ५०००० अनुदान देण्यात यावे या मागणी साठी किनगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी  जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिह भिकाने , जिल्हा उपाध्यक्ष राजीव मोहगावकर  भुजंगराव उगीले ,डॉ . मिलींद साबळे तसेच संतोष रोडगे यांनी आंदोलनाची भुमीका  स्पष्ट केली , यावेळी मनसेचे कुमार देशपांडे , विकास वाघमारे संतोष रोडगे कृष्णा जाधव यांच्या वतीने अहमदपुर तहसीलचे तह...

आर. बि. आय. आणि केंद्र सरकार

*आर.बी.आय.बँकेच्या एका रिटायर अधिकार्‍याचे मनोगत* ********************************* *नमस्कार बंधू - भगीनीनो, आणि माझ्या युवक - यवतीनो...* *मी कुठल्याही राज्यकर्त्यावर, सरकारवर किंवा पक्षावर टिका करीत नाही, आणि मी कुठल्याही पक्षाचा नाही, जी मी खाली माहिती देत आहे ती माझ्या आडतीस वर्षे तीन महिन्याचा अनुभव मांडत आहे, तरी देखील कोणाचे मन दुखावले असेल तर क्षमा असावी.सध्याचे केंद्र सरकारने  देशाची आर्थिक घडी विस्कटलेली आहे . व आता देशाला मूर्ख बनवत आहे ...  !!!* *मी रिझर्व्ह बँकेत लागलो तेव्हा "डिप" म्हणजे DEAP (Department of Economic Analysis & Policy) या विभागात सहा वर्षे काम केले, तसे म्हटले तर ऐंशीच्या दशकात वीस - बावीस डिपार्टमेंट होती, परंतु बँकेचे ह्रुदय (Heart) जर म्हटले तर वरील असणारे डिपार्टमेंट, (2) IDMD (Internal Debt Management Deptt. म्हणजे आंतरिक ऋण प्रबंध विभाग या विभागात सेक्शन Central govt. Loan State govt. Loan, Open market operation, wage & Means, PDRS इत्यादी सेक्शन्स आहेत (3) DEIO, (4) DBR- Deptt. of Banking Regulation (5) PDO - Public Debt Office(6) M...

कोवीड सेंटरच्या दरात कपात करण्याची रुग्ण हक्क . संघर्ष समितीची मागनी अन्यथा आंदोलन

इमेज
*खाजगी कोविड सेटंरचे शासकिय दर आणखीन कमि करावेत* .. *रुग्ण हक्क संघर्ष समितीचे निवेदन* प्र.लातुरः- खाजगी कोवीड सेंटर साठी शासनाने चार हजार ते नऊ हजार असे दर ठरवुन दिले आहेत परंतु हे दर सुद्धा सामान्यांना परवडनारे नाहीत त्यामुळे या दरामधे आणखी कपात करण्यात यावी अशी मागणी रुग्ण हक्क संघर्ष समिती कडुन निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की लॉकडाऊन मुळे सर्वसामान्य जनतेची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे व त्यातच करोना साथरोगाचे प्रमाणही वाढले आहे. सरकारणे खाजगी कोविड 19 हॉस्पिटल्स मध्ये उपचारसाठी शासकिय शुल्क नियमावली जाहिर केली आहे. हे शासकिय शुल्क हे जास्तीचे आहेत ते सरकारणे आणखीन कमी करुन रुग्णांना दिलासा द्यावा या मागणीचे निवेदन रुग्ण हक्क संघर्ष समितीचे *जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली समितीचा शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटुन सविस्तर चर्चा करुन मागणी निवेदनाद्वारे केली.* खाजगी कोविड सेंटर मध्ये शासनाने शासकिय दर निर्धारीत केले आहेत हे दर दररोज 4000 रु पासुन ते 9000 रु. पर्यत आहेत *या शासकिय दराप्रमाणे ...

आरक्षणासाठी आत्महत्येचा प्रयत्न

इमेज
मराठा तरुणाचा आरक्षण स्थगीती मुळे आत्महत्येचा प्रयत्न त्रिशरण वाघमारे प्र. लातुर सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण वर्ष 2020-21 साठी स्थगित करण्याचा निर्णय दिला आहे. याचे पडसाद आता राज्यात उमटायला सुरुवात झाली आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे एका उच्च शिक्षित तरुणाने लातूर जिल्ह्यातील चाकूर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.         याबाबत सविस्तर वृत्त चाकूर तालुक्यातील बोरगाव इथल्या किशोर कदम (वय 25) या तरुणाने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. तो सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. सर्वोच्च न्यायालयाने नोकरी आणि शिक्षणात वर्ष 2020-21 मध्ये स्थगिती दिल्याने किशोर याने चाकूरच्या तहसील कार्यालयासमोर विष प्राषण करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. मराठा आरक्षण प्रकरणाची आता घटनात्मक खंडपीठ सुनावणी पुढची सुनावणी करणार आहे. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती एल नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने मोठा निर्णय घेत आरक्षण...

बौद्ध स्मशानभुमी चिखलीची समस्या कधी सुटनार ?

इमेज
चिखली स्मशानभुमीचा प्रश्न २००८ पासुन प्रलंबीत  प्रतिनिधी लातुर : मौजे चिखली,ता. अहमदपुर, जि.लातुर येथील बौद्ध स्मशान भुमीचा प्रश्न बारावर्षांपासून प्रलंबीत आहे. वेळोवेळी प्रशासनाला यासंबधि निवेदनाद्वारे व तोंडी माहिती देऊन आजतागायत प्रश्न सुटलेला नाही       याबाबतीत सवीस्तर वृत्त असे की, चिखली गावातील बौद्ध स्मशानभुमी ची वंशपरंपरागत बारा गुंटे जमीन आहे. परंतु आजुबाजुच्या शेतकऱ्यांनी शेतीचे बांध प्रतिवर्षी थोडेथोडे पुढे सरकावत स्मशानभुमीच्या जमीनीवर अतिक्रमन करून आज त्याठीकाणी फक्त एकच गुंठा जमीन शिल्लक आहे. यासंबधी अहमदपुर तहसीलदाराना आजपर्यंत जवळपास आठ ते दहा वेळेस निवेदन देऊन यावर कोनतीच कारवाई करण्यात आली नाही. तसेच सदरील स्मशानभुमीस जाण्यासाठीचा रस्ता यावर सुद्धा अनेकांनी अतिक्रमण करून घरे बांधली आहेत. यासंबंधी १० / ६ / २०१९ रोजी तहसीलदारांना निवेदन दिले असता तकालीन तहसीलदारानी येरे माझ्या मागल्या या म्हणी प्रमाणे चिखलीवासीयांच्या तोंडाला पाने पुसण्याचं काम केलं. शेवटी गावकऱ्यांना केंद्रीय समाजकल्यान मंत्री रामदासजी आठवले यांच्याकडे धाव घ...

मनपा कर्मचाऱ्यांसाठी वंचित आघाडी आक्रमक

इमेज
मनपाचे 83 कर्मचारी सेवेत कायम करण्यासाठी वंचितचे निवेदन त्रिशरण वाघमारे लातुर : दिनांक ७/९/२०२० रोजी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने म.न.पा.मधील ८३ रोजंदारी कर्मचार्यांना मा.सर्वोच न्यायालयाच्या निर्णया प्रमाणे कायम स्वरूपी सेवेत समावून घेऊन त्या संबंधीचे सर्व लाभ देण्या करिता निवेदन देण्यात आले                                              सन २०१८ मध्ये मा. सर्वोच न्यायलयाने सदरील रोजंदारी कामगारांना कायम करून घेण्याचा आदेश दिलेला असतानाही आज तागायत म.न.पा लातूर कडून सदरील कर्मचार्यांना कायम करून घेतलेले नाही सदरील कर्मचारी २५ वर्षा पासून सेवेत शहरात साफसफाई काम करत असताना त्यांच्या वर हा मोठा अन्याय झालेला आहे आज रोजी त्यांच्यावर उपास मारीची वेळ आलेली आहे तसेच मा.सर्वोच न्यायालयचा आदेश असताना हि सदरील आदेश डावलण्याचे धाडस म.न.पा. कडून कोणाच्या सांगण्यावरून होत आहे याचा जाब आयुक्तांना विचारण्यात आला. सदरील कर्मचारांची मा.पालक मंत्र्यांनी कधीच दखल घेत...

रुग्ण हक्क संघर्ष समिती स्थापन

इमेज
रुग्णांच्या मदतीचा लातुरकरांनी घेतला ध्यास रुग्ण हक्क संघर्ष समीती स्थापन त्रिशरण वाघमारे  : कोरोनाच्या काळामधे डॉक्टरांनी चालवलेली लुट कोरोनावर कुठलाही इलाज किंवा कोरोनासाठी स्पेशल औषध उपलब्ध नसल्याने व मिडीयाने कोरोनाची भयंकर भिति निर्माण केल्याने सामान्य नागरीक भयभीत झाले होते व डॉक्टरांनी आकारलेल्या अव्वाच्या सव्वा बिलानी त्रस्त झाले होते . ही बाब जेव्हा लातुर येथील नामांकित विधीज्ञ असले तरी सामाजीक कार्यात हिरहिरीने भाग घेऊन जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सतत धडपडणारे अँड निलेश करमुडी यांच्या आणि त्यांच्या सहकारी मित्रांच्या चर्चेतुन रुग्ण हक्क संघर्ष समिती स्थापन करण्याची संकल्पना उदयास आली. या सर्वांनी मिळून त्या संकल्पनेस मुर्त स्वरूप दिले समिती स्थापन झाली. समीतीच्या कोअर कमिटीमधे अँड. निलेश करमुडी , प्रशांत चव्हान, संजयकुमार सुरवसे, अँड. तिरुपती शिंदे , अँड. विजय पंडीत , गंगाधर विसापुरे आणि सौ मिनाक्षी ताई शेटे या सर्वांचा समावेश आहे . ही रुग्ण हक्क संघर्ष समिती महाराष्ट्रातील प्रत्येक सामान्य नागरिकाच्या अन्याया विरोधात आवाज उठविनार आहे . ...

कोपरा ग्राम पंचायत अतिक्रमण हटवनार

अतिक्रण न हटविल्यास होणार कायदेशीर कार्यवाही त्रिशरण मोहगावकर वि.प्र. लातुर : ग्राम पंचायत कोपरा हद्दीतील सरकारी गायरान जमीनीवरील अतिक्रमण पोलीस बंदोबस्ताखाली हटविण्यात येणार होते , पोलीस प्रशासनासह महसुल प्रशासनासही पाचारण करण्यात आले होते परंतू अतिक्रमण धारकांच्या लेखी विनंती वरून सरपंच यांनी अतिक्रमण धारकास अतिक्रमण हटविण्या करीता दोन दिवसाची सवलत मानुसकिच्या दृष्टीकोणातून दिली असून अतिक्रमण न हटविल्या अतिक्रमण धारकावर कायदेशीर कार्यवाही करुन अतिक्रमन हटविणार असल्याचे सरपंच गंगाधराव देपे, उपसरपंच प्रा.बालाजी आचार्य, ग्रामसेवक पट्टेवाड, मंडळ अधिकारी दहीफळे तलाठी कोपरा ग्रामपंचायत ने आपल्या मासीक सभेत सरपंच गंगाधर देपे यांच्या अध्यक्षेतेखाली अतिक्रमण हटविण्याचा ठराव घेण्यात आला होता त्यानुसार ग्रामसेवक एस डी फड सध्या कार्यरत ग्रामसेवक रविंद्र क्षिरसागर यांनी नोटीस बजावून आतिक्रमण काढण्याचे सांगतले होते. या अतिकम्रण धारकाकडे कुठलेच कागदपञ नाहीत ग्रा प च्या नावे खुली जागा 120 बाय 150 आठ अ दस्तऐवजाला नोंद आहे त्याच बरोबर सरकारी गायरान 3 हेक्टर 54 आर सर्वे नं 72 मध्ये आहे याच जागेवर गावात...

बाळासाहेब आंबेडकर आणि पंढरी चा पांडुरंग

इमेज
अॅड बाळासाहेब आंबेडकर आणि पंढरपूर मंदिर प्रवेश  (उत्तम जोगदंड) अनेक बौद्ध बांधवांकडून, बाळासाहेब नेतृत्व करीत असलेल्या पंढरपूर मंदिर प्रवेश आंदोलनावर, उलट सुलट प्रतिक्रिया येत आहेत. त्यांनी कोणत्या देवाला नमन केले, कुठे तीर्थ-प्रसाद घेतला यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. यावर पुढे लिहण्याआधी इंग्रजांच्या काळातील एक किस्सा सांगू इच्छितो. हा कितपत खरा आहे हे माहिती नाही, पण विचार करण्यासारखा आहे.   असे म्हणतात की त्या काळात ख्रिस्ती धर्माचा प्रचार करण्यासाठी पोर्तुगीज लोकांनी हिंदूंच्या विहिरीत पाव टाकले. अशा पाव टाकलेल्या विहीरीतील पाणी जे कोणी प्यायले असतील ते बाटले असे म्हटले जायचे. मग हे बाटलेले लोक नाइलाजाने ख्रिस्ती धर्म स्वीकारायचे. म्हणजे हिंदू धर्म एवढा तकलादू होता का, कि पाव टाकलेल्या विहीरीतले पानी प्यायल्याने बाटला जाईल? यातील वास्तवाचा किंवा अतिशयोक्तीचा भाग सोडला तरी कोणत्या ना कोणत्या कारणाने बाटणे हा प्रकार अस्तीत्वात होता असे मानायला  जागा आहे. हा झाला धार्मिक प्रकार.  आता वरील विषयाकडे वळू या:  बौद्ध हा 'धम्म' आहे धर्म नव्हे असे ...

पंढरपुर येथील आंदोलन

इमेज
प्रकाश आंबेडकर आणि पंढरपूर मंदिर आंदोलन.. 1)आंबेडकरी चळवळीचे जे राजकारण आहे, त्याच्या काही मर्यादा आहेत. अनुसूचित जाती किंवा त्यातील नवबौद्ध चळवळीच्या केंद्रस्थानी आहेत. राजकारण हे बहुमता नुसार चालते. अनुसूचित जातीची लोकसंख्या संपूर्ण भारतात 16.4% आहे. त्यामुळे निवडून येण्यासाठी जे बहुमत लागते त्याची सतत कमतरता जाणवते.  2)जोपर्यंत ओबीसी आणि आदिवासी लोकांना सोबत घेत नाहीत तोपर्यंत आंबेडकरी राजकारणाला यश येणार नाही. 3)देव धर्म किंवा हिंदू धर्म सोडण्याची ओबीसी लोकांची मानसिकता तयार करणे अवघड आहे हे मागील सत्तर वर्षात सिद्ध झाले आहे. त्यामुळे ओबीसी लोकांची मानसिकता न बदलता राजकारण करता येऊ शकते का ? त्याचा प्रयोग प्रकाश आंबेडकर करत आहेत. 4)जानवेधारी हिंदू आणि बिगर जानवेधारी हिंदू यामध्ये त्यांनी फरक केला आहे. हा ऐतिहासिक फरक आहे. जानवेधारी हिंदूंचे देव हे वेगळे आहेत. जसे ब्रह्मा, विष्णू, ईंद्र इत्यादी..या वैदिक देवांची पूजा बिगर जानवेधारी हिंदू करत नाहीत. तर हा जो बिगर जानवेधारी वर्ग आहे त्याला वर्ण व्यवस्थेमध्ये शूद्र म्हणतात. वर्ण व्यवस्थेनुसार त्यांचा उपनयन संस्कार होत नाही. म्हणून ...