अपंगांच्या 5% निधीसाठी प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव आक्रमक परिसरातील ग्रामपंचायतींना दिले निधी वाटपाचे निवेदन
*किनगाव प्रहार जनशक्ती पक्षाचा वतीने अपंगांचा ५ टक्के निधी साठी किनगाव सर्कल मधील गावातील ग्रामपंचायतीस भेटी.* *किनगाव*:- प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव च्या वतीने किनगाव सर्कल मधील गावो गावी जाऊन अपंग 5% निधी वाटपासाठी प्रहार च्या वतीने उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज ग्रामपंचायत कार्यालय मोहगाव / गुंजोटी चे ग्रामसेवक यांना जिल्हा प्रमुख राजाभाऊ चौगुले, तालुका अध्यक्ष संभाजी दादा केंद्रे, तालुका युवा अध्यक्ष बाळासाहेब गायकवाडयांच्या मार्गदर्शनाखाली आज दि 31/10/2020 ग्रामपंचायत कार्यालय मोहगाव,गुंजोटी,येथे जाऊन पुनर्वसन कायद्यानुसार अपंग बांधवाचा या आर्थिक वर्षातील 5% निधी वाटप करावा कारण कोरोना माहामारीच्या काळात अपंग बांधवांची आर्थिक परिस्थिती खुप बिकट झाली आहे व त्यांना आधार देण्यासाठी राखीव असलेला 5%निधी वाटपासाठी प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव च्या वतीने सरपंच/ ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन देताना शहराध्यक्ष बाळू आमले, योगेश आमले (माळी) अध्यक्ष, उपाध्यक्ष मोहसीन शेख, कार्यअध्यक्ष प्रकाश जोशी, कोषाध्यक्ष एजाज पठाण, सचिव दशरथ हैगले,दिनेश किनकर, वैजनाथ चाक...